नार्को चाचणी 

           नार्कोसिस या शब्दाचे संक्षिप्त  रुप म्हणजे नार्को. 'नार्कोसिस' म्हणजे बेशुद्धीची अवस्था  किंवा अर्धवट शुद्धीची अवस्था. आणि अशी अवस्था ज्या प्रक्रियेद्वारे आणली जाते त्याला 'नार्कोसस' असे  म्हणतात. या नार्कोसस प्रक्रियेसाठी जे रासायनिक पदार्थ वापरले जातात; त्या पदार्थांना 'नार्कोटिक' असे म्हणतात. अफू, चरस, गांजा, कोकेन अशा पदार्थांना नार्कोटिक असे संबोधित केले जाते. गुन्हेगारांकडून सत्य वदवून घेण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून नार्को चाचणीचा वापर केला जातो. या चाचणीमध्ये आरोपीला Truth Serum या रासायनिक द्रव्याचे इंजक्शन दिले जाते. थोड्या वेळात आरोपी अर्धवट बेशुद्ध होतो. आपल्या विचारावर, मनावर त्याचे नियंत्रण रहात नाही. काय बोलायचे काय  बोलायचे नाही याचे भान आरोपीला रहात नाही. त्याचे मनोव्यापार अनियंत्रित चालू असताना पोलिस योग्य ते प्रश्न विचारुन त्याच्याकडून गुन्ह्यासंबंधी माहिती काढून घेतात. पोलिस खात्यात सन १९२२ मध्ये अमिरिकेत या चाचणीचा वापर प्रथम केला. पण तत्त्पूर्वीही अमेरिकेत लष्कर व गुप्तचर  खाते या चाचणीचा वापर करत असत.