स्वयंपाक घरात गॅस वापरताना 

१) गॅस सिलेंडर नेहमी उघड्या जागी ठेवावा. कपाटासारख्या बंदिस्त जागी ठेवू नये.
२) गॅस सिलेंडरच्या बाजुला वर्तमानपत्राची रद्दी, जुने कपडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत.
३) गॅस सिलंडरच्या बाजुला रॉकेल- पेट्रोल सारखे ज्वालाग्राही पदार्थाचे डबे ठेवू नयेत.
४) गॅस सिलेंडरच्या बाजुला ओलसरपणा, दमटपणा किंवा जास्त उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
५) गॅस सिलेंडर वापरात नसेल तर त्याची सेफ्टी कॅप त्यावर लावून ठेवावी.
६) सिलेंडर ठेवण्यासाठी चाकाच्या ट्रॉलीज वापरू नयेत.
७) गॅसचा रेग्युलेटर व्यवस्थित बसला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यावर साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का पहावे.
८) गॅस पुरवठा करणारी रबरी नळी 'आय. एस. आय.' चा शिक्का असलेलीच घ्यावी.
९) गॅस पुरवठा करणार्‍या नळीची लांबी दीड मीटरपेक्षा जास्त असू नये.
१०) गॅस पुरवठा करणार्‍या नळीला कोठे चिरा पडल्या नाहीत ना ते वरचेवर पहावे.
११) गॅस पुरवठा करणार्‍या नळीवर उकळत पाणी किंवा गरम तेल पडणार नाही याची काळाजी घ्यावी.
१२) गॅसची शेगडी घेतानाही आय. एस. आय. चा शिक्का पाहूनच खरेदी करावी.
१३) गॅसची शेगडी सिलेंडर पेक्षा उंचावर असावी.
१४) गॅसची शेगडी जमिनीपासून कमीत कमी दोन फुटावर असावी.
१५) गॅसच्या शेगडी खिडकीजवळ ठेवू नये.
१६) गॅस शेगडी मागच्या भींतीवर कपाटे असू नयेत.
१७) गॅसच्या शेगडीचा बर्नर पितळी असावा. लोखंडी बर्नर गंजल्याने आतील छिद्रे बुजतात.
१८) क्रोमियम प्लेटिंगपेक्षा स्टेनलेसस्टिलची शेगडी जास्त काळ टिकते.
१९) स्वयंपाक करण्याची पूर्वतयारी व्यवस्थित करून मगच शेगडी पेटवावी.
२०) गॅसवरील पदार्थाला उकळी आल्यावर गॅस बारीक करावा.
२१) गॅस शेगडीवर अन्न शिजवताना लहान बर्नरवर लहान भांडे व मोठ्या बर्नरवर मोठे भांडे ठेवावे.
२२) स्वयंपाकासाठी सपाट बुडाची भाडी वापरल्यास गॅसची बचत होते.