माझी खेळणी 

खेळणी माझी छान ग
माझ सर्व ऐकतात ग
गुपचूप जागी बसतात ग
हलवायला लागते मलाच ग || १ ||
बोलत नाहीत माझ्याशी
अळी मिळी गुपचिळी
हसणे नाही रडणे नाही
रुसणे फुगणे मुळीच नाही
म्हणूनच मला आवडतात ग
माझी खेळणी छान ग  || २ ||
हत्ती, अस्वल, सिंह, वाघ,
कुत्रा, मांजर, बैल, गाय
सारे कसे मित्र मित्र
मजेत रहातात एकत्र
म्हणूनच मला आवडतात ग
माझी खेळणी छान ग || ३ ||
कधी मी होते त्यांची आई
कधी होते त्यांची बाई
बाहुली माझी मुलगी
प्राणी सगळे विद्यार्थी
गुपचूप मार खातात ग
म्हणूनच मला आवडतात ग || ४ ||