मंदिर गणपतीपुळ्याचे 

सागराच्या कुशीत, डोंगराच्या उशीत
लपलय एक सुरेख मंदिर ||
ठेंगणाच ठुसका आहे याचा बांधा
भला भलाही लीन होतो याच्या दारा ||
पक्ष्यांची किलबिल पानांची सळसळ
सोबतीला आहे याच्या स्तोत्रांचे पठण ||
पावलागणिक पाठ थोपाटतो वारा गारेगार
हिरवीगार वनश्री करते श्रम परिहार ||
उंच उंच तरुवर अथांग सागर
मोहवितो येथला केवड्याचा सुगंध ||
स्वादिष्ट मिठाई सुवासिक अगरबत्ती
मूर्तींचीही रेलचेल आहे येथल्या दुकानी ||
दूरवर ज्याची पसरलेय किर्ती
अशा या मंदिरात विसावलेय गणेश मूर्ती ||