आकार 

अभ्यास करून दमलात फार
चला ओळखू आता आकार
आळस तुमचा जाईल पार
नका देऊ तुम्ही नकार |
पाटी, दप्तर, वही, पुस्तक ,
सार कस चौकोनी |
फळा, टेबल, बाक, पट्टी,
कंपास पेटीही चौकोनी ||
नवल कशाला करता तुम्ही ;
अहो वर्गच अपुला चौकोनी || १ ||
सारच गोल स्वयंपाक घरी |
नीट निरखून पहा तुम्ही |
तवा, पोलपाट ताट वाटी |
गोलच आहेत ताटली  झाकणी |
चपाती, पुरी, लाडू चकली |
झालीच पाहिजे गोल जिलेबी |
कांदा बटाटा टोमॅटो लिंबू
गोलच आहेत नवलकोल कोबी || २ ||
त्रिकोणी आकार फारसे नाहीत ?
सामोसा त्रिकोणी म्हणते आई |
पताका, डोंगर आहेत की त्रिकोणी |
दोन त्रिकोणांची बनते चांदणी |
कागदी होडीची घडी त्रिकोणी
आणखी त्रिकोण सांगेल का कोणी ?