रुमाल 

असा कसा हा रुमाल बाई
असा कसा हा रुमाल ||
आईच्या कमरेला बाबांच्या खिश्यात
दादाच्या गळ्याला ताईच्या हातात
सदैव सुरक्षित असतो घडीत ||
असा कसा हा रुमाल बाई
असा कसा हा रुमाल
माझ्याकडे येतो अन चुरगळूनच जातो
हात नाक पुसून रंगच याचा बदलून  जातो ||
असा कसा हा रुमाल बाई
असा कसा हा रुमाल
माझ्याकडे येतो अन हरवून जातो
धम्मक लाडू मात्र मला देववतो ||