माझे ताट 

हा ठेवला पाट
ही ताट वाटी
हात पाय धुवून आले
आता वाढ ग आई ||
ताटात भात
भातावर वरण
वरणावर तूप
आता वाढ ग आई ||
गव्हाची चपाती
जोंधळ्याची भाकरी
एक तरी गरम गरम
वाढ ग आई ||
पाल्याची भाजी
कडधान्याची उसळ
असेल जरी तिखट तिखट
चालेल ग आई ||
कच्ची कोशिंबीर
चटणी नी लोणच
अगदी थोड थोडस
वाढ ग आई ||
वाटीत दे ताक
पेल्यात दे पाणी
आता येईल ना आई,
ताकद मला खरीखुरी ||

कवीयित्री : सौ. नीला हरेश परुळेकर