केवळ पत्री नव्हेत; औषधी वनस्पती . 

            गणपतीच्या पूजेची पत्री, फुले काढून मी घरात आणली. चांगली धुवून ती ताटात सुबक लावावी म्हणून हॉलमध्ये येऊन बसले. शेजारीच कोचावर आयुर्वेदाचा अभ्यास करणारा माझा पुतण्या बसला होता. माझ्या समोरील ताटाकडे पाहून तो म्हणाला , "काकी, तुला गम्मत सांगू? यातील सर्व पाने, फुले औषधी आहेत" मी म्हटले, "अरे या पत्री आहेत उद्या गणपतीच्या पुजेची ही तयारी चालली आहे." तो म्हणाला "तुझ्या दृष्टीने त्या पत्री असतील, पण आता या प्रत्येक पानाचे औषधी गुण मी तुला सांगतो" आणि त्याने एकेक पानाचा औषधी उपयोग सांगायला सुरुवात केली.
१) जाई - त्वचेला गौरवर्ण आणि तजेला आणण्यासाठी; तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. त्वचाविकारांवरही त्याचा उपयोग होतो. पित्तनाशकही आहे.
२) पारिजात - सुंदर केसांसाठी उपयुक्त आहे.
३) चंपक - मासिक पाळीच्यावेळी होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी तसेच मासिक पाळी नियमित यावी म्हणून उपयोगी.
४) वडाचे पान - अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळळ्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो.
५) आघाडा - स्त्रियांच्या योनीमार्गात होणार्‍या रोगांवर औषधी. बद्धकोष्टतेवर उपयोगी.
 ६) केवड्याचे पान- शरीराला गोरा रंग यावा, शरीराची उष्णता कमी व्हावी , तसेच गर्भस्त्राव कमी करण्यासाठी औषाधी म्हणून वापरतात. केसांनाही हितकारक आहे.
७) दुर्वा - पित्तनाशक, दाहशामक म्हणून उपयोगी.
८) ब्राहमी - केशवर्धक व बुद्धिवर्धक म्हणून उपयोगी.
९) तुळस -कफविकार, दमा इ. वर औषधी, स्मरणशक्ती वाढते मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. कोलस्ट्रोल कमी होते, मेदवृद्धी, डोकेदुखी , कोलायटीस इत्यादी वर औषधी.
१०) बेल - मधुमेहावर , उच्च रक्तदाबावर गुणकारी , तसेच बेलफळाचा गर जुलाब होत असल्यास देतात.
११) माका - केसांच्या वाढीसाठी उपयुक्त. केस विकारांबरोबरच यकृत विकारांवर औषधी. 
१२) पिंपळ -  स्मरणशक्ती  वाढवण्यासाठी याच्या सालाची राख इसबावर लावतात.  कोवळ्या पानाची चटणी मधाबरोबर घेतल्याने तोंडातील व्रण जातात.
१३) मधुमालती - याच्या पानांचा रस चर्मरोगावर उपयुक्त.
१४) धोत्रा - कंपवातावर उपयुक्त.
१५) शमी - दाह शामक, उष्णतेच्या विकारांवर उपयोगी.
१६) मंदार - कफ विकार, अंगदुखी याबरोबरच कुत्रा चावल्यावर याच्या पानांचा रस उपयोगी.
१७) कण्हेर - विंचुदंशावर उपयुक्त.
१८) अर्जुन - पान वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.
१९)  देवदार - डोकेदुखी, अंगदुखी व सर्दीवर उपयुक्त.
२०) अगस्ती - ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादिवर उपयुक्त.
२१) डाळींब - खोकल्यावर गुणकारी औषध.
पुतण्याने सांगितलेली माहिती ऐकून मी आश्चर्यचकीत झाले.


Herbalism is a traditional medicinal or folk medicine practice based on the use of plants and plant extracts. Herbalism is also known as botanical medicine, medical herbalism, herbal medicine, herbology, herblore. The scope of herbal medicine is sometimes extended to include fungal and bee products, as well as minerals, shells and certain animal parts.
Traditional use of medicines is recognized as a way to learn about potential future medicines.
Plants have evolved the ability to synthesize chemical compounds that help them defend against attack from a wide variety of predators such as insects, fungi and herbivorous mammals. By chance, some of these compounds, whilst being toxic to plant predators, turn out to have beneficial effects when used to treat human diseases. Such secondary metabolites are highly varied in structure, many are aromatic substances, most of which are phenols or their oxygen-substituted derivatives.
At least 12,000 have been isolated so far; a number estimated to be less than 10% of the total. Chemical compounds in plants mediate their effects on the human body by binding to receptor molecules present in the body; such processes are identical to those already well understood for conventional drugs and as such herbal medicines do not differ greatly from conventional drugs in terms of how they work. This enables herbal medicines to be in principle just as effective as conventional medicines but also gives them the same potential to cause harmful side effects. Many of the herbs and spices used by humans to season food yield useful medicinal compounds.
Reference http://en.wikipedia.org/wiki/Herbalism