असा असावा शिक्षक 

१) शिक्षक हा-- शि म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्य दक्ष असावा.
२) शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे स्वतः च्या विषयात पारंगतता प्राप्त करून घ्यावी अध्यापन कला अवगत करून घ्यावी
३) शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत करावे त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
४) शिक्षकाला विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता, प्रेम असावे. आपल्या विद्यार्थ्याचे कोणाही मुळे नुकसान होत असेल तर त्याविरुद्ध झगडण्यासही त्याने तयार असावे.
५) शिक्षक हा नवविचारांचा निर्माता, प्रचारक असावा.
६) न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन लोकशाही जीवनपद्धती या मूल्यांना समोर ठेवून शिक्षकाने स्वतःला विकसित करावे.
७) विद्यार्थ्यावर आपले विचार न लादता शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मताचा आदर करावा. त्याला प्रकटीकरणाची संधी द्यावी. शिक्षकाने केवळ मार्गदर्शन करावे.
८) विज्ञानयुगातील नवनवीन आव्हाहनांना सामोरे जाण्याइतके सक्षम बनवणारे शिक्षण शिक्षकाने विद्यार्थ्याला द्यावे.
९) शिक्षकाने स्वतः क्रियाशील, उपक्रमशील असावे व विद्यार्थ्याला क्रियाशील रहाण्याची प्रेरणा द्यावी.
१०) शिक्षकाने धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद, याचा विचार न करता सर्वांना समान शिक्षण द्यावे.
११) शिक्षकाने विद्यार्थ्यातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक घटनेमागील कार्यकारण भाव शोधण्याची सवय विद्यार्थ्यांना लावून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा.
१२) शिक्षकाने आपल्या बोलण्यातून, वागण्यातून चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर बिंबवावे.
१३) शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यातील चांगल्या वाईट गुणावगुणांची पारख करून त्याला त्याच्या विकासाचा योग्य मार्ग दाखवावा.
१४) शिक्षकाने आपण दिलेल्या शब्दाशी प्रामणिक रहावे. सदैव सत्य तेच बोलावे.
१५) शिक्षकाने जिज्ञासू वृत्ती धारण करून नित्य नव्या गोष्टी जाणून घ्याव्यात शिक्षक व्यासंगी, सखोल अभ्यास करणारा असा असावा.
१६) शिक्षकाने श्रमप्रतिष्ठा जोपासावी कोणतेही काम कमी प्रतीचे न मानता सहजतेने करावे.
१७) शिक्षक अष्टपैलू, अष्टावधानी असावा. आपल्या विषयाव्यतिरिक्त इतर कलागुणांची आवड त्याला असावी.
१८) शिक्षकाला आपल्या संस्थेबद्दल, वरिष्ठांबद्दल प्रेम, आदर असावा. त्याच्या भल्यासाठी त्याने कायम झटण्यासाठी तयारी दाखवावी.
१९) शिक्षकाने आपल्या अध्यापनात विविधता, नाविन्य, कल्पकता जोपसावी. विविध अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना विषय सहज समजेल अशा कौशल्याची जोपासना करावी.
२०) शिक्षकामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीचे निर्णय स्वतः घेता येण्याची क्षमता असावी.
२१) शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.
२२) शिक्षकाने पालक व समाज यांच्या संपर्कात राहावे .त्यांच्या सहकार्याने समजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवावा.
२३) शिक्षकाने, आपली वाचन क्षमता, श्रवणक्षमता वाढवावी भरपूर लेखन करावे.
२४) शिक्षकाने आपल्या विचारांशी ठाम असावे ते विचार इतरांना पटवून देण्याचे भाषणकौशल्य व लेखन कौशल्य शिक्षकात असले पाहिजे.
२५) शिक्षक साहसी, धैर्यवान, परोपकारी, धडपड्या, निरपेक्षवृत्तीचा असावा. त्याच्या प्रत्येक कामात रेखीवता व वाणीत मधुरता असावी. त्याची रहाणी साधी व विचारसारणी उच्च असावी.