अनुवाद करताना 

१)  अनुवाद करताना ज्याच भाषांतर करायच त्या पुस्तकाची भाषा आणि ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व हव.
२) ज्या पुस्तकाच भाषांतर करायच त्यातील मुद्दे, विषय, कथा, त्यातील वातावरण, लेखकाच्या भावना व्यवस्थित समजून घेऊन भाषांतर करावे.
३) अनुवाद करताना त्यातील व्याकरण शुद्धतेकडे लक्ष दिल गेल पाहिजे.
४) अनुवाद करताना भाषांचे विविध शब्दकोष आपल्या संग्रही असणे गरजेचे आहे.
५) अनुवाद करताना महत्त्वाचे मुद्दे अगोदरच काढून ठेवावेत.
६) भाषांतर करताना कठीण शब्दांचे अर्थ अगोदर शोधून लिहून ठेवावेत.
७) ज्या भाषेत भाषांतर करायच त्या भाषेच सौंदर्य अनुवादात दिसले पाहिजे.
८) अनुवाद करताना ज्या लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद करणार त्या लेखकाशी, संबंधित व्यक्तिंशी सतत संपर्कात राहून येणार्‍या अडचणींचे वेळोवेळी निराकरण करून घ्यावे.
९) अनुवाद करताना अनुवादकाने सर्व भाषांतर स्वतःच करावे मदतनीसाकडे त्यातील काही भाग सोपवू नये.
१०) अनुवाद करताना तपशील नोंदवणे, मुद्दे एकत्रित करणे इतर आवश्यक माहिती गोळा करणे यासाठी आवश्यक वाटल्यास मदनीसाची मदत घ्यावी म्हणजे सर्व भार एकट्यावरच पडत नाही.
११) अनुवादकाला आपल्या अनुवादकलेत त्रुटी आहेत असे वाटत असेल तर अनुवादविषय कोर्स करावेत.