पार्टीला जाताना 

१) पार्टीचे निमंत्रण मिळाल्यावर यजमानांना ते मिळाल्याचे कळवावे. व आपण पार्टीला येणार की नाही येणार तेही सांगावे.
 
२) पार्टीला जाताना आपल्याला खाण्या पिण्याची काही पथ्ये असतील,  उपवास  असेल तर तसे  अगोदर यजमानांना कळवावे म्हणजे आयत्यावेळी त्यांची धांदल होणार नाही.

३) पार्टीसाठी जाताना ज्या निमित्ताने पार्टी असेल त्याला अनुसरून आपला पोशाख असावा.

४) पार्टीला जाताना दिलेल्या वेळे आधी कमीत कमी दहा ते पंधरा मिनीटे अगोदर पोहचावे.

५) पार्टीला जाताना यजमानांसाठी एखादी भेटवस्तू आवर्जून घ्यावी.

६) पार्टीला आमंत्रण नसलेल्या इतर कोणाला आपल्या बरोबर नेऊ नये.

७) पार्टीच्या ठिकाणी जेवणासाठी टेबलावर बसल्यानंतर टेबल नॅपकीन आपल्या मांडीवर पसरावा.

८) पार्टीच्या टेबलावर ताठ बसावे, आनंदी व उत्साही असावे. व आपल्याबरोबर बसलेल्या सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधावा.

९) पार्टीला गेल्यावर काट्याचमच्यांचा वापर करायचा असल्यास हाताच्या तळव्यात काट्याचमच्यांचे दांडे धरावेत . तर्जनी व अंगठ्याच्या चिमटीत पुढची बाजु धरावी.

१०) पार्टीला गेल्यावर खाताना तोंडाचा मचमच आवाज करू नये.

११) छोटे छोटे घास घेऊन सावकाश जेवावे.

१२) एखादा पादार्थ आवडला नसेल तरी तो थोडासा चाखून पहावा.

१३) जेवताना हाताचे कोपर टेबलाला लागणार नाही असे बसावे.

१४) जेवताना तोंडात घास असताना बोलू नये.

१५) जेवताना गप्पा मारताना पाण्याचे पेले धक्का लागून पडणार नाहीत  किंवा काटे चमचे इतरांना लागणारा नाहीत याची काळजी घ्यावी.

१६) पार्टीला जाताना कोणत्याही वादग्रस्त विषयावर चर्चा करू नये.

१७) पार्टीला गेल्यावर आपल्या बरोबरच्या सर्वांना वाढून झाल्यावर मगच जेवायला सुरुवात करावी.

१८) पार्टीला गेल्यावर आपली प्लेट अगदी साफसूफ करण्यापेक्षा थोडे पदार्थ त्यात राहिले तरी चालतील.

१९) जेवून झाल्यावर काटेचमचे प्लेटच्या मधोमध ठेवावेत.

२०) आपले जेवण अगोदर झाले व टेबलावरून उठायचे असल्यास एक्सक्यूज मी असे म्हणून उठावे.

२१) पार्टीचे जेवण आवडले नाही तरी यजमानांसमोर त्याची स्तुती करावी.

२२) पार्टी करुन निघताना यजमानांचे आभार मानून मगच बाहेर पडावे.