काहितरी सांगायचे होते.... 

काहितरी सांगायचे होते,
बोलणे तुझे खुपची ऐकले,
आता शब्दांना मार्गस्थी लावायचे होते,
माझ्या हृदयात तुझे खाते उघडायचे होते,
प्रत्यही तुला हसत पहायचे होते,
मोजके क्षण मनात लपवायचे होते,
आणि काहीतरी सांगायचे होते.....,
मेंदूची घमनी अलगत वळते,
सुर्य, चंद्र, तारे नभाआड लपले,
विघ्नकर्त्याचे जगही थांबते,
शूरवीर मनही हारून जाते,
जेव्हा माझ्या नजरेत तू येते,
हेच कारणी काहितरी सांगायचे होते.....,
तूची म्हणालीसी मी नंतर भेटते,
तुझी गाथा मी नंतर ऐकते,
आधी माझ्या प्राणसख्याला भेटूनी येते,
उत्तर ऐकूनी मनमस्तकात शल्य शिरते,
नेत्र- कपाळावर मस्ती येते,
आताही मन तिच्यावर मरते,
जगसंचालकाला हे मान्य नव्हते,
आजही मी जगाला सांगत राहतो,
तिला काहितरी सांगायचे होते.....!


कवी :- नईम पठाण.