शांततेची आठवण 

मैत्रीची हि नाती त्यासोबतची,
क्षणाक्षणाला आठवण त्या चेहर्‍याची,
देहबोली त्या शब्दांची,
सूत्रे गवसली रे रडत्याला हसविण्याची,
अभ्यासाची शस्त्रे वेचण्याची,
राजाची. चपळाई गुंफण्याची|
शोधूनही न गावे, असे त्याचे मन कोणी जरा पहावे,
अंश त्याच्या सानिध्याच्या, सर्वांनी मनात लिहावे,
निगा राख त्याची असे इश्वरास कोणीतरी कळवावे,
आदर मज वाटतो, आज सर्वांना सांगावे,
इश्वरचरणी एकची मागणी, असे मन सर्वांना लाभावे|
आई वडिलांचा तोची लाडका, म्हणतसी होइलकी आता बोलका
'जेंटलमन' हे पद  त्याचे!, नाही कोणी त्यासारखा
सुंदर कसुरीचे मन घेवूनी उतरलेला,
बौद्धीक कुळात जन्मलेला, नेत्रातुनी मनात सामावलेला,
जाताना तेची नेत्र भरवूनी गेला,
सांगा त्या परमेश्वराला, घेऊनी या परत त्याला |
'उद्धव' हे नाव त्याचे, करी सर्वांचा उद्धार,
पण मित्रा तुझ्याविना हरला हा दरबार,
अन आठवणिंची तिजोरी देवूनी झाला तू पसार.|


कवी:- नईम पठाण