उन्नती 

हे सर्व जाती पाती...
पुरातत्त्व  ग्रंथातील,
हिणा हि उदासवृत्ती ...
तेजोनिधी येईलच दिठी,
बदला हि जगण्याची  रीती...
ओढून घ्या साम्राज्य हाती,
कितीही राती...
उरली आता कुणाची भीती,
पृथ्थक करा हि भ्रमंती...
"एकता ध्यास बाळगा उन्नती"...
होईल सर्वत्र शांती...
जेव्हा सौख्यात समावतील मानवजाती,
जे कराल तेच उरेल पाठी...
कारणी, मेल्यावरच होईल खोटी स्तुती,


कवी :- नईम पठाण