व्हॅनिला 

आज व्हॅनिला सुगंध बहुचर्चित आहे अनेक खाद्य पदर्थ, सुगंधी स्प्रे , साबण , बॉडीलोशन्स इत्यादी मध्ये त्याचा वापर केला जातो हे लक्षात आल्यावर व्हॅनिला आहे  तरी काय ? याबाबत कुतुहल जागृत झाल, व मग त्यादष्टीने  माहिती गोळा करायला सुरवात केली. तेंव्हा त्याविषयी खूप  मजेशीर माहिती हाती आली.
अनेक उत्पादनांमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला  'कृत्रिम व्हॅनिला' असतो. तो लाकडाच्या लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करुन तो मिळविला जातो. अशी प्रक्रिया करुन मिळविलेला व्हॅनिला  स्वस्त पडतो. उलट नैसर्गिक व्हॅनिला खूप महाग आणि अथक प्रयत्नांनी उपलब्ध होतो.
            नैसर्गिक व्हॅनिला "ऑर्किड" जातीच्या  व्हॅनिला वनस्पतीपासून मिळतो. झाडाच्या खोडावर चढत चढत जाणारी हिरव्या मांसल देठाची व लांब पानांची ही वेल असते. दमट पावसाळी हवेत ती चांगली वाढते. परसबागेत काढता येणारे हे पीक आहे. फारशी मजुरी लागत नाही. घरचीच माणसे हे काम करु शकतात. एका एकरात सुमारे आठशे वेली लावता येतात. व वर्षाला ४०० किलो इतके पिक येते. पण गम्मत  अशी कि या ऑर्किडच्या फुलांना कोणताच सुगंध नसतो. ती फक्त आकर्षक असतात. पण या फुलांपासून ज्या शेंगा येतात; त्या सुकवल्यानंतर त्यांच्यातून सुवास येऊ लागतो. आणि त्याहून गम्मत म्हणजे या शेंगा सूर्य प्रकाशात वाळवल्या तरच त्या सुगंधित होतात. या शेंगांची आणखी गम्मत म्हणजे या ऑर्किडच्या फुलांमधील परागकोष  व स्त्रीकेसराग्र माणसांनी एकमेकांवर दाबले की त्याचे परागीभवन होऊन शेंग तयार होते नाहीतर परागीभवनाअभावी फुलापासून शेंगा तयारच होत नाही.
       व्हॅनिला ही दक्षिण अमेरिकेने जगाला दिलेली देणगी आहे. 'व्हॅनिला प्लॅनिकोलिया' हे त्याचे शास्त्रीय नाव. दक्षिण अमेरिकेतील ही वनस्पती स्पॅनिश खलाशांनी युरोपात आणली. पण त्याचे उत्पादन फारसे येत नव्हते. म्हणजे ढीगभर झाडे लावली तर एखाद्याच झाडाला शेंग यायची. बाकी ती सुंदर फुलांची झाडेच रहायची.
         त्यानंतर फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञांनी या व्हॅनिलाचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळून आले की विशिष्ट प्रकारच्या मधमाशांपासून यांचे परागीभवन होते. ही गोष्ट लक्षात येताच फ्रेंचांनी आपल्या रियनियन आणि बुरबॉज बेटावर मोठ्या प्रमाणात व्हॅनिलाची लागवड केली. तसेच डच, स्पॅनिश इत्यादी लोकांनीही प्रयोग करण्यास सुरवात केली. जावा, फिलिपिन्स, भारतातही व्हॅनिलाची लागवड करण्यात आली या झाडांनाही फुलेच आली. पण त्याचे फलीकरण फार कमी झाले. आणिव्यापार दृष्ट्या असे पीक घेणे अशक्य ठरले.
                     पण याच काळात फ्रेंचांच्या रियुनियन बेटावरील बागेत काम करणार्‍या एका गुलामाने जादू केली. सहज म्हणून त्याने आर्किड फुलाचा ओठासरखा पुढे आलेला भाग हाताने बाजुला केला. आणि त्यामधील दांडी बाजुला करुन परागकोष व स्त्रीकेसराग्र एकमेकांवर दाबली. या त्याच्या कृतीमुळे त्या फुलापसून पुढे शेंग तयार झाली. हा प्रयोग पुढे अनेक फुलांवर त्याने केला. व त्याला अपेक्षित यश मिळाले. त्याच्या बेटावर नैसर्गिक व्हॅनिलाचे जोरदार पीक आले.
              आज सार्‍या जगात एडमंड नावाच्या या गुलामाच्या पद्धतीनेच ऑर्किडचे फलीकरण करण्यात येऊन प्रचंड प्रमाणावर व्हॅनिला सुगंध तयार करण्यात येतो.Vanilla

Vanilla is a flavoring derived from orchids. The word vanilla derives from the Spanish word "vainilla", little pod. Hernán Cortés is credited with introducing both vanilla and chocolate to Europe in the 1520s. Hundreds of years ago in the tropical forests of the Aztec kingdom, an ancient group of people discovered the fruit of a delicate orchidand a flavor they called vanilla. The Totonaco people of the Vera Cruz region in Mexico were the first to cultivate the divine vanilla crop. Vanilla is the second most expensive spice after saffron,because growing the vanilla seed pods is labor intensive.Despite the expense, vanilla is highly valued for its flavor, As a result, vanilla is widely used in both commercial and domestic baking, perfume manufacture and aromatherapy. Vanilla grows best under filtered sunlight. It flourishes well in partial shade that cuts out about 50% sunlight. Since it is a climbing vine, it requires support for growing. Vanilla grows as a vine, climbing up an existing tree (also called a tutor), pole, or other support. It can be grown in a wood (on trees), in a plantation (on trees or poles), or in a "shader", in increasing orders of productivity. Most artificial vanilla products contain vanillin, which can be produced synthetically from lignin, a natural polymer found in wood. Most synthetic vanillin is a byproduct from the pulp used in paper-making, in which the lignin is broken down using sulfites or sulfates. In India Vanilla is successfully grown in Kerala, Karnataka, Andaman & Nicobar Islands, Tamilnadu and N.E Regions of India.