रांगोळी 

भारतातील चौषष्ट कलांमधील एक कला म्हणजे रांगोळी. शुभसुचक व अशुभनिवारक  म्हणून अंगण,उंबरठा,देवघर,तुळशीवृंदावन, इत्यादी ठिकाणी नियमित रांगोळी काढली जाते. सण व उत्सवांचे मांगल्य व पावित्र्य रांगोळीमुळे निश्चितच वाढते. पावित्र्याबरोबर सौंदर्याचा साक्षात्कार घडवणारी ही रांगोळी भारतातील सर्व राज्यात काढली जाते. फक्त विविध राज्यातील तिची नावे व ती रेखाटण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत.बहुतांशी रांगोळी गारगोटीपासून बनवली जाते. तसेच शंखजिर्‍याची भाजून केलेली पडू, तांदूळपीठी, संगमरवराचे चूर् , भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, धान्य, फुल किंवा फुलांच्या पाकळ्या, पाने, हळद कुंकु आदिंचा वापर करून रांगोळी काढण्याची पदधत भारतात आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, बंगाल आदि ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी तांदळाच्या पीठीचा वापर करतात मध्य प्रेदेशात चुन्यामध्ये  रंगासाठी पाने वाटून, हंळद घालून किंवा गुलाल घालून रंगीत रांगोळी बनवली जाते. महाराष्ट्रात शिरगोळे नावाच्या पांढर्‍या दगडापासून रवाळ चूर्ण बनवून रांगोळी म्हणून ते वापरले जाते. कोकणात भाताची फोलपटे जाळून त्याचे पांढरे चूर्ण बनवले जाते.रांगोळी जशी वेगवेगळ्या साधनाने बनविली जाते तशी ती विविध प्रकाराने काढली जाते.
१) ठिपक्यांची रांगोळी ही रांगोळी काढण्याची पारंपारिक पदधत आहे.
२) मोठमोठ्या समारंभात, उत्सावात, हॉटेल्स, देवळे इत्यादि ठिकाणी फुलापानांच्या रांगोळ्या जागेची व
     समारंभाची शोभा वाढवतात.
३) पाण्यावर व मेणावर काढलेल्या तरंगत्या रांगोळ्या हे तर कौशल्याचेच काम आहे.त्यासाठी परात कोरडी करून घेतात.त्याच्या तळाला पांढरे व्हॅसलीन चोपडतात. व्हॅसलिनने सर्व तळ भरला गेला पाहिजे. त्यावर पांढर्‍या रांगोळीने हवे ते आकार काढून रंग भरतात. हे सर्व झाल्यावर परात २-३ मिनिटे मंद विस्तवावर गरम करतात. त्यामुळे तळाची रांगोळी पक्की होते. थंड झाल्यावर कडेने परात भरेल एवढे पाणी ओततात.
४) विविध रंगाच्या डाळी, कडधान्य, रंगवलेले तांदूळ यांचा वापर करुनही छान रांगोळ्या काढता येतात.
५) तादुळाची ओली पेस्ट वापरुन जशी रांगोळी काढली जाते तशी फेविकॉल, पोस्टर्स कलर्सचा वापर
     करुनही आजकाल रांगोळ्या काढत्या जातात.    
६) चमकदार उठावदार रंगाचा वापर करुन स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र आदि प्रतिके एकमेकांना जोडून
     काढलेल्या "संस्कार भारती"च्या प्रचंड मोठया रांगोळ्यां आज खूपच लोकप्रिय झाल्या आहेत.
७) आजच्या धावपळीच्या युगांत गृहिणी बाजारात विकत मिळणार्‍या चाळणी, छापे, पेने, छिद्रांच्या
      नळ्या आदिंचा वापर करुनही झटपट रांगोळ्या काढू शकतात.
८) नक्षीदार स्टिकर्सही बाजारात उपलब्ध आहेत. ते दारापुढे  लावूनही रांगोळीची हौस भागवली जाते.
९) लग्नसमारंभ, केळवण, डोहाळे जेवण, मुंज इत्यादि प्रसंगी जेवणाच्या पंगतीत ताट व पाटा भोवती
     रांगोळी काढली जाते त्याला महिरप. असे म्हणतात. ही महिरप रांगोळीने, फुलांनी काढतातच पण
     ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून पुठ्ठा, मणी टिकल्या, वापरुन अगोदरच महिरप तयार करुन ठेवतात. काहीवेळा कापडावर भरतकाम, रंगकाम करुनही अशा महिरपी बनवल्या जातात.
१०) गुढी पाडव्याच्या शुभप्रसंगी "चैत्रांगण" नावाची खास रांगोळी काढली जाते. गेरुने किंवा शेणाने 
      सारवलेल्या एका चौकटीत अनेक प्रतिकांनी ती सजवली जाते. या प्रतिकांमध्ये जेष्ठा व कनिष्ठा अशा
      दोन गौरी, पाट व त्यावर श्रीचक्र,  बाजुला पंखे, तसेच चंद्र सूर्य, तारे, शंख, चक्र, गदा पद्म, गोपद्म,
      लक्ष्मीची पावल, स्वस्तिक, कलश, ध्वज   त्रिशूळ, धनुष्यबाण, डमरु, फणी, आरसा, करंडा,
      प्रवेशद्वार, तुळशीवृंदावन, बिल्वद,  नाग, कासव, हत्ती, तोरण, पाळणा,  श्रॄंखला, ओमकार  
       इत्यादि शुभचिन्हांचा समावेश होतो.
   हिंदूसंस्कृतीत रांगोळीमध्ये हीजी शुभचिन्हे वापरली जातात त्यांना काही विशिष्ट अर्थ आहेत.
१) कमल - वैभव, दीर्घायुष्य, कीर्ती यांचे प्रतीक.
२) शंख- नाद, किंवा आवाजाचे प्रतीक.
३) लक्ष्मीची पाऊले- धनधान्य समृदधीचे प्रतीक.
४) गोपद्म- पावित्र्याचे प्रतीक.
५) सुर्य- तेजस्विता, प्रकाशदायकतेचे प्रतीक.
६) चंद्र- सौभाग्य, शीतलता व सौंदर्याचे प्रतीक.
७) गदा- शौर्य व बुद्धीचे प्रतीक.
८) कलश- जलदेवता, शांतीसूचक व पंचमहाभूते, विश्वरचनेचे व कल्याणकारतेचे प्रतीक.
९) बिंदू- बीजाचे प्रतीक.
१०) अर्धवतुळ- ज्ञान, संस्कृती व समृद्धीने भरलेल्या घडयाचे प्रतीक.
११) तुरा- स्वाभिमान, सौंदर्य व मानाचे प्रतीक.
१२) सर्परेषा- वाहनाचे प्रतीक.
१३) चक्र- भूत, वर्तमान, भविष्य यांचे परिवर्तन करणार्‍या कालाचे प्रतीक तसेच विज्ञानाचे व गतिमानतेचे प्रतीक.
१४) स्वस्तिक- शुभकार्याची सुरवात, गतीमानता शांती व समृद्धीचे प्रतीक याच्या चार बाजू म्हणजे  
       धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे मानले जाते.
१५) बाण- एकग्रतेचे प्रतीक.
          अशा चिन्हांनी सुशोभित रांगोळी मनाला आनंद व प्रसन्नता देतेच. पण खर अचंबित करतात त्या चित्र रांगोळ्या . अनेक रांगोळी प्रदर्शनातून त्या पहायला मिळतात. विविध क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्ती, निसर्ग देखावे, पशुपक्षी, काळीज हेलावून टाकणारे प्रसंग,इत्यादिंच रांगोळीच्या सहाय्याने केलेले रेखाटन तोंडात बोटे घालायला लावते. डोळे विस्फारतात. आणि त्या कलाकाराच्या हस्तकौशल्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. खरोखरच अशी कला म्हणजे परमेश्वराची देणगीच.
                      Rangoli

Rangoli is a symbol of religious and cultural beliefs. It is considered an important part of the spiritual process. These are decorative designs made on floors of living rooms and courtyards during Hindu festivals and are meant as sacred welcoming areas for the Hindu deities.. Rangoli and similar practices are followed in different Indian states; in Tamil Nadu, one has Kolam, Madanae in Rajasthan, Chowkpurna in Northern India, Alpana in Bengal, Aripana in Bihar, and so on. The purpose of Rangoli is decoration and it is thought to bring good luck. Generally, rangoli is made on occasions such as festivals, auspicious observances, celebrations of marriages and other similar milestones and gatherings. Rangoli designs can be simple geometric shapes, deity impressions, flower and petal shapes etc. In Rangoli, unique colors are used to make Rangoli very attractive and colorful. Generally, the basic color of Rangoli is white. This base colour has been mixed properly with other colors to get the colors many different shades. Sometimes, even different flower petals are used to decorate rangoli. Nowadays different types of stencils are also available in market to create rangoli designs. Rangoli is a traditional Indian art. These are decorative designs made on floors of living rooms and courtyards during Hindu festivals. They are meant as sacred welcoming areas for the Hindu deities. Rangoli is made in two ways. Dry and wet. Both a generous and is created by adding other points. Rangoli designs can be simple geometric shapes, deity impressions, flower and petal shapes. The base material is usually dry or wet granulated rice or dry flour, to which vermilion, turmeric and other natural colors can be added. Chemical colors are a modern variation. Other materials include colored sand and even flowers and petals. The ancient symbols have been passed on through the ages, from each generation to the next, thus keeping both the art form and the tradition alive. The patterns are typically created with materials, including colored rice, dry flour, sand or even flower petals. The purpose of Rangoli is decoration, and it is thought to bring good luck. Design-depictions may also vary as they reflect traditions, folklore and practices that are unique to each area. It is traditionally done by women, but over the years modern additions have been adapted. Generally, this practice is showcased during occasions such as festivals, auspicious observances, celebrations of marriages and other similar milestones and gatherings. Refer - http://en.wikipedia.org/wiki/Rangoli for more details