रंग आला 

रंग आला रंग आला
या बेरंग दुनियेतला
हरवलेला रंग आला ||
निळाई पसरली आकाशी
हिरव्याने धरली जागा डोंगर अन माळरानाची ||
पिवळा म्हणे मी जातो रवीकडे
पसरवितो तेज पृथ्वीकडे ||
लाल म्हणाला मी रक्तात नहातो
सजीवांमध्ये सळसळतो, धमन्यांतून पळतो ||
काळा म्हणे मी रात्रीत शिरतो
शांत गारव्यात जगाला मिठीत घेतो ||
फुले म्हणाली या या आमच्यात या
सामावून आम्हाला अधिक सुंदर करा ||
फुलपाखरे बोलली पंखावरी विसावा घ्या
फळे कुजबुजली रसाला आमच्या बहार आणा ||
सफेद म्हणाला शिरतो लोकांच्या मनामध्चे
शांतीच्या छ्टा पसरवितो सार्‍या जगामध्ये ||

                                                                       कवयित्री:- गार्गी कोचरेकर.