मोरपीस 

मोरपीस तुझ्या आठवणींसारखच ह्ळूवार
त्याच्या प्रत्येक  धारेला तुझा स्पर्श
त्याच्या प्रत्येक रंगात तुझी स्वप्न
त्याच्या प्रत्येक स्पर्शात तुझा निवास
त्याच्या अलगदपणात तुझा श्वास
त्याच्या कोमलतेत तुझी वाणी
त्याच्या निखळते तुझ हसण
त्याच्या प्रत्येक दृष्टीत तुझ बघण
मोरपीस हे माझच मन
हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवलेल.

                                                            कवयित्री :- गार्गी कोचरेकर.