निवारा 

रिमझिम पावसात नहाले विश्व
दरवळला नसानसात मृदगंध |
आल्याचा चहा अन गरमागरम भज्या
वासानेच ओरडला भुकेचा कावळा |
फिरु पावसात तुडवत, लांब रस्ता
चहूकडे हिरवळ, देईल डोळ्याला विसावा |
नको ती छत्री, नको तो रेनकोट
नकोच कोनाडा एखादा सुका |
विसरु शिस्त समाजाची,
उडवून लावू भिस्त जनाची |
चल रे सखया दोघेच जावू
गुंफूनी हात हातात चालू |
बनवूया विश्व अपुल्या स्वप्नांचे
प्रेम आणि विश्वास नांदतील तेथे |
दुनियादारीला नसेल तेथे थारा
हळूवार मनांचा असले तो निवारा |

                                                          कवयित्री:- गार्गी कोचरेकर.