फुलदाणी सजवताना 

१.]    फुलदणीत जी फुले ठेवायची ती ताजी असावीत. त्यांचे देठ लांब असावेत.
२.]    तोडलेल्या फुलांचे दांडे लगेचच पाण्यात बुडवून ठेवावेत.
३.]    फुले  फुलदाणीत ठेवण्यापूर्वी त्यांचे देठ एकसारखे कापून घ्यावेत. कापलेल्या देठांच्या शेवटी तिरपा छाट घेतल्यास पाणी जास्त शोषले जाते.
४.]    फुलांचा जेवढा देठ पाण्यात बुडणार आसेल तेवढ्या देठावरील पाने काढून टाकावीत. सर्व पाने काढू नयेत.
५.]    देठाचा पाण्यात बुडालेला भाग रोज छाटावा.
६.]    फुलदाणीतील पाणी रोज बदलावे
७.]    फुलदाणीत लावलेल्या फुलांची सुकलेली पाने व सुकलेल्या पाकळ्या रोजच्या रोज काढून टाकाव्यात.
८.]    फुलदाणीतील फुलांची रचना नियमित बदलावी.
९.]    फुलदाणीतील फुले जास्तकाळ टिकवायची असतील तर फुलदाणीतील पाण्यात पोटॅशियम परमँगनेट,      तुरटी, साखर, मोरचूद, अ‍ॅस्परीन, यासारखी रसायने एक लिटर पाण्यात एक ग्रॅम याप्रमाणात मिसळावीत.
१०.]  फुलदाणीत निशीगंधाची दांडी ठेवायची असेल तर ज्यावर पहिली कळी उमलली आहे अशी दांडी निवडावी.
११.]  गुलाबाचे फूल फुलदाणीत ठेवायचे असेल तर ते साधारण दहा ते पंचवीस टक्के उमललेले घ्यावे.
१२.]  फुलदाणीत शेवंती किंवा अ‍ॅस्टरसारखी फुले ठेवायची असतील तर ती मात्र पूर्ण उमललेलीच घ्यावीत.
१३.]  फुलदाणी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावी.त्यात तांब्याचे नाणे ठेवावे.
१४.]  फुलदाणीत ठेवायचे पाणी उकळून गार केलेले असावे. फुलदाणीत निम्म्यापेक्षा कमी पाणी भरावे.
१५.]  फुलदाणी उंच असेल तर तिच्या उंचीच्या दिडपट उंचीची रचना करावी. व जर फुलदाणी पसरट असेल तर तिच्या रुंदीच्या दिडपट रुंद रचना करावी.
१६.]  रचना करताना मोठ्या उंच किंवा लांब दांड्याच्या फुलांचा वापर अगोदर करावा. व नंतर लहान किंवा आखूड दांड्याची फुले वापरावीत.
१७.]   फुलदाणीत पानांचा जास्त वापर टाळावा.
१८.]   फुलदाणीत फुले, पाने भरताना ती कोंबून भरू नये. तसेच फुलांची संख्या शक्यतो विषम असावी व रंगसंगती साजेशी असावी.
१९.]   फुलदाणीतील रचना पूर्न झाल्यावर त्यातील फुलांवर थोडे पाणी फवारावे.