कुणी उंदीर देता का उंदीर

कुणी उंदीर देता का उंदीर 


"बेंच वर उभा रहा तास संपेपर्यंत, 
ह्या असल्या घाणेरड्या अक्षरात शुद्धलेखन लिहण्याची हिम्मत झालीच कशी तुझी, अरे अक्षर आहेत का उंदराचे पाय"

बापरे..! सर आज जास्तच रागवले माझ्यावर. पण हि काय पहिली वेळ नव्हती. या आधी ही माझ्या अक्षरांची तुलना उंदराच्या पायाशी झाली होती. खुप वेळा सर म्हणाले होते कि, तुझ्या अक्षरांपेक्षा उंदराचे

हिशोब

हिशोब


"मला आताच्या आता ताबडतोब भेटायचाय तुला नेहमीच्या ठिकाणी" हे एकच वाक्य बोलुन तिने फोन कट केला. आणि मी हातातली सगळी कामे बाजूला ठेवून तिला भेटण्यासाठी निघालो. आजही नेहमीप्रमाणे मीच तिच्या आधी पोहोचलो होतो. आणि नेहमीप्रमाणे एक डोळा घडळ्याकडे आणि एक डोळा ती येण्याच्या दिशेला लावुन बसलो. मगाशी तिने जे वाक्य फोनवर सांगितल (आठ शब्दांचे वाक्य) ते वाक्य ती मेसेजवर

डायरी

डायरी !


मी रोज नदी किनारी त्या दगडावर बसुन माझी तिच रोजची जुनी पुरानी फाटलेली डायरी वाचत असे. ती माझी रोजची सवयच होऊन गेली होती. रोज तिच नदी, तोच दगड, आणि तिच दिशा. सर्व काही तेच तेच तेच फक्त डायरीचं पान मात्र वेगळं. नियतीने मला या निसर्गावर सोडलं आहे, मला कुणीच मित्र नाही कुणी नातेवाईक सुद्धा नाहीत, माझ्या कुणी जवळचं असेल तर फक्त अन फक्त ही डायरी ! ही डायरी जर नसती तर म

टूथब्रश डे

सकाळी उठल्यावर प्रथम हातात येणारी वस्तू म्हणजे टूथब्रश. ब्रश म्हणजे दातांचा झाडूच. आज विविध आकारात आणि विविध प्रकारात उबलब्ध असलेल्या या टूथब्रशची प्रथम निर्मिती करण्याचा मान चीनने पटकावला. सन१४९८च्या जून महिन्याच्या सव्वीस तारखेला त्याची निर्मिती झाली असे म्हटले जाते. म्हणूनच २६ जून हा टूथब्रश डे म्हणून साजरा केला जातो. टूथब्रशच्या निर्मितिपूर्वी कडूलिंब व बाभळीच्य

ग्वाल्हेरचा किल्ला

        भारतातील मध्यप्रदेश राज्यात असलेला कलात्मक आणि भव्य असा ग्वाल्हेरचा किल्ला पहाण्याचा योग आला. जमिनीपासून साधारणतः तीनशे फूट उंचीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. पावणे दोन मैल लांबी आणि २८०० फूट रुंदी असलेल्या या किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच आहे. किल्ल्याच्या उत्तरेला स्वर्णरेखा नदीचे खोरे, तर पश्चिमेला उखाही नावाची खोल दरी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला ग्वाल

गांडुळखत

गांडूळ म्हटले कि "शी ! गांडूळ !" अशीच प्रतिक्रिया प्रथम उमटते.या लिबलिबित ओंगळ प्राण्याचा आपल्याला काही उपयोग होऊ शकेल हे खरेच वाटत नाही. पण खर तर गांडूळ  शेतकर्‍यांचा सच्चा मित्र आहे. अत्यंत कमी खर्चात उत्कृष्ट प्रकारचे खत हे गांडूळ मित्र शेतकर्‍यांना पुरवत असतात.हे गांडूळ खत शेणखतापेक्षा तीन ते चार पट परिणामकारक असते. गांडूळ रोज त्याच्या वजनाइतके खातात आणि तेवढीच विष्टा टाक

मालतीबाई बेडेकर

 "कळ्यांचे नि:श्वास", "हिंदोळ्यावर", "बळी" आदी अनेक पुस्तकांतून स्त्रियांची दु:खे जगासमोर निर्भयपणे मांडणार्‍या परखड लेखिका म्हणून मालतीबाईंचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. पुण्याजवळच घोडनदी येथे एक ऑक्टोबर सन १९०५ मध्ये मालतीबाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील अमेरिकन मिशन स्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. या अमेरिकन मिशन स्कूलमध्येच मालतीबाई म्हणजेच लहानपणीच्या बाळूताई खरे या

माझे नाव ब्राह्मणी मैना

     होय. "ब्राह्मणी मैना" असे नाव असणारा मी एक पक्षी आहे. आता मैना ठिक आहे; पण त्यापाठीमागे ब्राह्मणी शब्द पाहून तुम्ही नक्कीच चक्रावला असाल. पक्ष्यांमध्येसुद्धा ही जातीची टक्केवारी वगैरे प्रकरण असते की काय? अशी शंकाही तुमच्या मनात नक्कीच आली असेल. तर तसे मुळीच नाही. माझ्या काळ्या चकचकीत डोक्यावर असलेल्या काळ्या शेंडीमुळे मला हे नाव मिळाले आहे. याशिवाय माझ्या डोक्यावर

धुके आणि धूर

हिवाळा म्हटला कि नजरेसमोर पसरते दाट धुके. थंडीने कुडकुडत बाहेर रस्त्यावर पाऊल टाकावे तर डोळ्यासमोरील काही अंतरावरील वस्तू अस्पष्ट दिसायला लागतात. धुक्यातल्या पाण्याच्या बाष्पकणांवरुन वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशाचे परावर्तन होऊन वाहन चालकांना समोरचे नीट दिसत नाही. त्यामुळे बस ट्रेन आदि वाहनांना आपल्या मार्गावरुन वाट काढून पुढे जाणे मुश्किल होऊन जाते. आणि नेहमीचा ओळ

कोतवाल पक्षी

'शेतकर्‍यांचा मित्र" म्हणून कोतवालाची ओळख करून द्यावी लागेल. कारण शेतीचे नुकसान करणारे कीटक हेच याचे अन्न असते. त्यामुळे शेताच्या कुंपणावर, गुरांच्या पाठीवर किंवा वीजेच्या तारांवर बहुधा कोतवाल पक्षी बसलेले आढळतात. तसे कोतवाल पक्षी ओळखायला सोपे असतात. चमकदार काळा रंग, दुभंगलेली शेपटी हे याच खासवैशिष्ट्य. तो साधारणतः एकतीस से.मी. आकाराचा, सडपातळ अणि चपळ असतो. भारताप्रमाणेच  हा